|| छत्रपती सुत्र ||
● शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर साहेबांचा कार्यकर्त्यांसाठी आदेश ●
www.fb.com/chhatrapatisutra
१) सतत समाजात फिरत रहावे.
सर्व स्तरावरील व्यक्तींच्या प्रमुखांना भेटावे.
२) सामान्य लोकात मिसळावे व रहावे.
३) प्रत्येकाने आपली डायरी बनवावी,लिहावी,पाळावी व कार्यक्रम आगावु कळवावा.
४) राहणीमान साधे,स्वच्छ,प्रसन्न,निर्व्यसनी असावे.
आपल्या खर्चाचा भार कार्यकर्त्यांतवर टाकु नये.
५) दररोज नवनव्या कुटुंबांना भेटावे.
कोणत्याही लिखाणावर,वाचनावर,ऐकण्यावर,सांगण्यावर,पाहण्यावर जसाच्या तसा विश्वास ठेवू नका.
त्याचे विश्लेषण करुन तटस्थपणे मेरिटवर निर्णय घ्या.
६) संयम व सातत्य हीच मोठी ताकद असते.
७) शासकीय कर्मचारी व अधिकारी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवावे व त्यांना चांगल्या कामासाठी नेहमी सहकार्य द्यावे.
८) विज्ञान व सत्याचा स्वीकार करावा.
९) इतरांचा मान राखा,तुमचा सन्मान राखला जाईल.
आपला अपमान झाला असे कधीच वाटू देवु नका.
सामाजिक एकता निर्माण होईल असे कार्यक्रम सतत ठेवा.
१०) घरात व समाजात संसद निर्माण करून सर्वांशी संवाद ठेवा.
सर्वांना सहभागी करुन घ्या.
सत्य स्विकारून संघर्ष टाळावा.
- आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब
( संस्थापक अध्यक्ष मराठा सेवा संघ )
No comments:
Post a Comment