|| छत्रपती सुत्र ||
शिवराज्याभिषेक दिन ६ जुन राष्ट्रीय सण जाहीर करा...
www.facebook.com/chhatrapatisutra
जय जिजाऊ
तमाम बहुजनांचे आराध्य दैवत कुळवाडीभुषण छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा ६ जुन १६७४ ला किल्ले रायगडवर पार पडला.रयतेला वाली मिळाला.हा दिवस बहुजनांचा पहीला स्वातंत्र्यदिन आहे.
त्यामुळेच दिवसेंदिवस हा दिवस बहुजन समाजाकडुन मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे.
या दिवशी किल्ले रायगडवर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोक हजेरी लावत आहेत.दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे.
युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्या नेतृत्ववाली या सोहळ्यास लोकोत्सवाचे स्वरुप प्राप्त होत आहे.
त्यामुळे ६ जुन हा दिवस राष्ट्रीय सण म्हणु जाहीर करावा अशी आग्रही मागणी समाजातील सर्व स्तरावरील जनमाणसांमधुन जोर धरु लागली आहे.
शासनने याबाबत पाऊले उचलुन तमाम शिवप्रेमी जनतेच्या मागणीचा आदर करुन शिवराज्याभिषेक दिन ६ जुन हा राष्ट्रीय सण म्हणुन घोषित करावा ही अपेक्षा..
हा सण कशा प्रकारे साजरा करावा याबाबत माझे मत...
● ज्यांना ज्यांना शक्य आहे,त्यांनी कुटुंब/मित्रांसमवेत ६ जुन या दिवशी किल्ले रायगडवरती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहुन महाराजांना अभिवादन करावे.
● ज्यांना रायगडवर जाणे शक्य नसेल त्यांनी घरी सर्वांनी सकाळी लवकर उठावे.
दारात रांगोळ्या काढाव्यात.
घरावर भगवा शिवध्वज लावावा.
घरी गोडधोड,पुरणपोळीचा स्वयंपाक करावा.
मित्र/नातेवाईक यांना घरी जेवणास बोलवावे.
● घरात तसेच गावात सर्वांनी एकत्रीत जमुन छत्रपती शिवरायांच्या मुर्ती/प्रतिमेला पुष्पहार घालुन दुग्धाभिषेक घालावा.
शिवरायांना अभिवादन करावे.
जिजाऊ वंदना म्हणावी.
● घरी व गावात आनंदी वातावरण असावे.
● एकमेकांच्या घरी जाऊन मिठाई भरवुन एकमेकांना शिवराज्याभिषेक दिनाच्या सदिच्छा द्याव्यात.
● या दिवशी नवीन संकल्प,खरेदी कराव्यात.
● गावात प्रबोधनाचे कार्यक्रम घ्यावेत.
● या दिवसाचे पावित्र्य,मांगल्य,महत्व राखले जाईल याची सर्वांनी खबरदारी घ्यावी.
|| सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या कोटी कोटी शिवमय सदिच्छा ||
-अनिल माने.
No comments:
Post a Comment