Saturday, 2 August 2014

बदल

सर्व जग बदलण्याचे स्वप्न जरुर पहावं,पण आपल्या संपर्कातील एखाद-दुसऱ्या व्यक्तीला आणि तेही थोडसं बदलु शकलो तरी समाधान मानावं.
मुख्य म्हणजे इतर कुणाला बदलण्याचा उद्योग सुरु करण्यापुर्वी आपण स्वतःला  बदलण्याच्या दिशेने शक्य तितका प्रवास केलेला असावा.
सूर्यही सगळ जग एकदम प्रकाशित करु शकत नसेल तर आपण तसं करण्यचा हट्ट कशाला करायचा.
पण सगळं जग एकदम प्रकाशित करु न शकणारा सूर्य स्वतःही सातत्याने प्रकाशमय राहतो.

-डॉ.आ.ह.साळुंखे

No comments:

Post a Comment